पनवेल / प्रतिनिधी :- दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जागोजागी महापालिकेतर्फे नाल्यांची सफाई करण्यात येते, यंदाही पनवेल मधील बहुतेक ठिकाणी नाल्यांच्या सफाईचे काम आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी विविध ठिकाणी जाऊन जातीने नालेसफाई करून घेत आहेत, तसेच अनेक बुजलेले नाले देखील यावेळी पुनः सुरू करण्यात येत आहेत.
यावेळी स्वतः आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड यांनी गुजराती प्राथमिक शाळा, उरण रोड येथील चेंबर्स, आय.टी.आय येथील नाले, तसेच साईनगर येथील नाल्यांची सफाई करून घेतली आहे, जेणे करून पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल.अश्या प्रकारे पनवेल महानगर पालिकेतील सर्व ठिकाणी नाले सफाई जोरात सुरू राहणार असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.
छाया : राजेश डांगळे.