बेकायदेशीररित्या जुगार खेळणार्‍यांवर पनवेल तालुका पोलिसांची कारवाई....

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळणार्‍यांवर पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास 1 लाख 89 हजार 780 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील खैरणे गावाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका शेतातील विहिरीजवळील झाडाच्या खाली काही इसम रोख रक्कमेचा पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार, सहा.पो.नि.प्रशांत शिर्के, सहा.पोलीस उपनिरीक्षक मनोहर चव्हाण, पो.ना.दिनेश चव्हाण आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेवून त्या ठिकाणी उभी असलेली वाहने, रोख रक्कम व इतर ऐवज असा मिळून 1 लाख 89 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Comments