पनवेल / वार्ताहर :- कोविड झाल्यावर जशी वास घेण्याची क्षमता जाते, जिभेची चव जाते, तसं काहीसं मनाचं झालं आहे. आजूबाजूचं मरणाचं पेटलेलं स्मशान पाहून कुठलाच आस्वाद घेण्याची, आनंद उपभोगायची इच्छा राहिलेली नाही, असे उद्विग्न उद्गार पनवेल तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अभिजित पाटील यांनी सध्याची कोव्हीड परिस्थिती पाहून काढले, त्यातच त्यांचा आज वाढदिवस मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत साजरा करायचा नाही असे त्यांनी ठरवले व कोविडशी कडवी झुंज देणाऱ्या महाराष्ट्र सरकारला आपला छोटासा हातभार लावावा म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी सुपूर्द केला. जे पैसे अन्यथा मौजमजेत खर्च झाले असते, त्यातून कुणाला तरी जगण्यासाठी ऑक्सिजन मिळेल हेच एकमेव समाधान त्यांच्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री कोव्हीड फंड मध्ये १लाखाचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द