पनवेल- लाईन आळी येथे श्री हनुमान जन्मोत्सव साधेपणाने साजरा....
पनवेल वैभव :  हनुमान मंदिर लाईन आळी येथे पनवेलवासी समस्त देशस्थ मराठा मंडळा तर्फे सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात यतो परंतू कोव्हिडच्या जागतिक महामारीमुळे यंदाही लॉकडाऊन मुळे मंदिरे बंद असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी श्री देव हनुमंताची शोडोपचारे विधिवत पूजा अर्चा करून जन्माचा पाळणा म्हणून पुष्पर्पण करून  महाआरती घेण्यात आली. तसेच आलेल्या भाविकांना सुंठवडा व तार्थप्रसाद देण्यात आला. त्याचप्रमाणे ही जागतिक महामारी कायमची निघून जावी यासाठी श्री देव हनुमंताला सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.

यावेळी मंदिराचे अध्यक्ष अनिल कुरघोडे, उपाध्यक्ष रविंद्र पडवळ,सदस्य -लक्ष्मण कुरघोडे, अनिल टेमघरे, प्रमोद कुरघोडे,अभिजित चव्हाण, मा.नगरसेविका प्रमिला कुरघोडे, कुणाल कुरघोडे, पुजारी योगेश म्हात्रे, गणेश मानकामे, अशोक पडवळ, जेष्ठ पत्रकार गणेश कोळी मा.उपनगराध्यक्ष मदन कोळी आदींची उपस्थिती लाभली.
Comments