पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थे तर्फे गरीब गरजूंना अन्नदान वाटप...
पनवेल / संजय कदम :-  आज दि.३० एप्रिल  शुक्रवार रोजी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थे मार्फत अन्नदानाचे ठरल्या प्रमाणे सातत्य  गोरगरीब लोकांचा रोजगार बंद पडले आहे, या सारख्याचे सामाजिक जाण ठेवत अन्नदान वाटप पंचशील नगर, आदई तलाव शेजारील झोपडपट्टी, नवीन पनवेल सेक्टर ६ समोरील झोपडपट्टी तील गरीब गरजू आशा जवळ जावक ३००लोकांना मोफत अन्नदान वाटप करण्यात आले,
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे उपाध्यक्ष अशोक आखाडे खजिनदार भानुदास वाघमारे यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाची माहिती देताना पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी सांगितले की हप्त्यातून दोन दिवस सोमवार व शुक्रवार रोजी अन्नधान वाटप करण्याचे ठरवले आम्हाला हे अन्नदान दररोज करण्याची इच्छा आहे त्यासाठी दानशूरानी पुढे येऊन या अन्नदानाच्या कार्याला मदत करून या कोरोना प्रदूर्भावच्या काळात व लॉक डाऊन च्या दिवसात दान देऊन सहभागी व्हावे असे आपणास आवाहन करण्यात येत आहे. याच अन्नदान बरोबर आम्ही पनवेल, नवीन पनवेल परिसरात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दररोज चहा बिस्कीट पाणी वाटप करण्याचे सातत्य ठेवत आहे.
तरी आपण वस्तू स्वरूपात दान मदत करून प्रोत्साहन द्यावे,

या सामाजिक कार्यासाठी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार , सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, कमिटी सदस्य अमेय इंगोले,रामदास खरात ,हेमा रोड्रिंक्स संतोष जाधव वल्ली महमद शेख ,संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे,सागर चव्हाण, अनिल खिलारे आदी सह विशेष मेहनत घेणारे रहिवाशी सुशांत पाटील, दीपक खरात, विनोद इंगोले,कडबा गाडगे, अमोल गाडगे जितू घाटविसावे, संजय कंठाळे,संजय तायडे, जूम्मंनभाई, संजीव ठाकूर , आमन तायडे अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे,उमेश पलमाटे,अनिल वानखेडे धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके,रोहित चव्हाण आदींनी मेहनत घेऊन या पुढेही मेहनत घेणार आहेत.
Comments