पनवेल / संजय कदम :- आज महाराष्ट्र सह पनवेल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन चालू असल्यामुळे गोरगरीब लोकांना रोजगार बंद पडले आहे हातावरच्या पोट भरणाराचे हाल चालले आहेत याची सामाजिक जान ठेवत पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थे मार्फत सोमवार दि.२६ एप्रिल पासून गरीब गरजूना मोफत अन्नदान वाटप खांदेश्वर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देविदास सोनवणे साहेब यांच्या हस्ते वाटपाची सुरवात करण्यात आली,यावेळी सोनवणे साहेबांनी या अन्नदान वाटप करण्याच्या कामाचे कौतुक केले संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी कार्यक्रमाची माहिती देताना पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी सांगितले की आता आम्ही संस्थेचे पदाधिकारी सदस्यनी वर्गणी काढून हप्त्यातून दोन दिवस सोमवार व शुक्रवार रोजी अन्नधान वाटप करण्याचे ठरवले असून पनवेल, नवीन पनवेल परिसरात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दररोज चहा बिस्कीट पाणी वाटप करण्यात येणार आहे, आम्हाला पनवेल मधून प्रतिसाद वाढत आहे या सामाजिक कामासाठी युग प्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या पनवेलच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले, असेच प्रतिसाद सर्वांनी देऊन संस्थेला या सामाजिक कामासाठी सरळ हाताने दान करू जास्ती जास्त लोकांना अन्नदान करून गरजूचे पोट भरण्याचे सामाजिक कार्य चालू ठेवण्यास मदत करावी असे आवाहन करण्यात आले.
या सामाजिक कार्यासाठी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार , सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, कमिटी सदस्य अमेय इंगोले,रामदास खरात,हेमा रोड्रिंक्स, संतोष जाधव,वल्ली महमद शेख ,संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे, आदी सह विशेष मेहनत घेणारे रहिवाशी दीपक खरात, विनोद इंगोले,कडबा गाडगे, अमोल गाडगे, जितू घाटविसावे, संजय कंठाळे, संजय तायडे, जूम्मंनभाई, संजीव ठाकूर,आमन तायडे,अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे,उमेश पलमाटे,अनिल वानखेडे धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके, रोहित चव्हाण आदींनी मेहनत घेतली.