पनवेल, दि.१७ (संजय कदम) ः नवी दिल्ली येथून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांना त्यांच्या एलआयसी व भारती पॉलिसीचे 30 लाख रुपयाचे बोनस मिळत असल्याचे सांगून बोनस रक्कमेच्या 10 टक्के रक्कम तसेच जीएसटी व टॅक्स इतरही कारणे सांगून वेळोवेळी लबाडीच्या इराद्याने अज्ञात आरोपीने सदर इसमाच्या खात्यामधून 26 लाख 41 हजार 216 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शहरातील साईनगर परिसरात राहणारे कोची भोपींदर सिंग सहाणी (36) यांना आरोपीने संगनमत करून त्यांच्या मोबाईल फोनवर तसेच त्यांच्या ई-मेल आयडीवरुन ते एलआयसी मुद्रा डिपार्टमेंट नवी दिल्ली येथून बोलत असल्याचे भासवून त्यांना एलआयसी व भारती पॉलिसीचे 30 लाख रुपयाचे बोनस मिळत असल्याचे सांगून बोनस रक्कमेच्या 10 टक्के रक्कम तसेच जीएसटी व टॅक्स इतरही कारणे सांगून वेळोवेळी लबाडीच्या इराद्याने अज्ञात आरोपीने सदर इसमाच्या खात्यामधून 26 लाख 41 हजार 216 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.