हातावर पोट असलेल्या बांधवांसाठी धावले खांदेश्‍वर पोलीस ठाणे....
हातावर पोट असलेल्या बांधवांसाठी धावले खांदेश्‍वर पोलीस ठाणे
पनवेल, दि.१९ (संजय कदम) ः हातावर पोट असलेल्या गोरगरीब बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे वपोनि देवीदास सोनावणे व त्यांचे सहकारी धावले असून या बांधवांसाठी त्यांनी गेल्या चार दिवसापासून सकाळ-संध्याकाळ जेवण तसेच मास्कचे वाटप केले आहे.
लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्यामुळे तसेच शुक्रवार ते सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन कडक पाळण्यात येत असल्याने मोलमजुरी करणारे नाका कामगार तसेच हातावर पोट असलेले बांधव व त्यांच्या कुटुंबियांचे जेवणामुळे हाल होत होते. ही बाब लक्षात येताच खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे वपोनि देवीदास सोनावणे व त्यांच्या पथकाने खाजगी संस्थेचे सहकार्य घेवून गेल्या चार दिवसापासून या बांधवांना दोन वेळचे जेवण तसेच मास्कचे वाटप केले आहे. आगामी काळात सुद्धा खांदा वसाहत परिसरात अशा प्रकारच्या गोरगरीबांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल, अशी माहिती वपोनि देवीदास सोनावणे यांनी दिली. 


फोटो ः वपोनि देवीदास सोनावणे व त्यांचे सहकारी अन्न वाटप करताना
Comments