पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः तेलाच्या डब्याचे पैसे ऑनलाईन पे केले असे सांगून मोबाईल वरील खोटा संदेश दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी विरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबोली, सेक्टर आठ येथील किशोर बारसनीया यांचे किरण ऑईल डेपो नावाचे शॉप सेक्टर 5, कळंबोली येथे आहे. त्यांच्या दुकानात एक अनोळखी इसम साहित्य खरेदी करण्याकरता आला. त्यावेळी त्याने किशोर यांना त्यांचे साहिल ट्रेडर्स नावाचे पनवेल, टपाल नाका येथे दुकान असल्याचे सांगितले. यावेळी त्याला खाद्यतेल हवे असल्याचे सांगून जीएसटी बिल हवे असल्याचे सांगितले. अनोळखी इसमाने त्याचा जीएसटी क्रमांक किशोर यांना दिला. त्यानंतर अनोळखी इसमाने आशीर्वाद ओईल मिल्स कंपनीचे गोविंदा ब्रँडचे सूर्यफूल तेलाचे सात डबे पाहिजे असल्याचे सांगितले. किशोर यांनी त्याला सात खाद्य तेलाचे डबे दिले. व पक्के बिल दिले. या डब्यांचे पंधरा हजार 700 रुपये ऑनलाईन पाठवतो असे सांगून मोबाईलमधून एनईएफटी द्वारे पंधरा हजार 700 रुपये पाठवले असल्याचे सांगितले. व तो संदेश त्याच्या मोबाईल मधून दाखवला. मात्र ऑनलाईन पाठवलेले पैसे दोन तास झाले तरी आले नाहीत म्हणून त्यांनी जीएसटी नंबर ऑनलाईन चेक केला असता तो चुकीचा असल्याचे किशोर यांना समजले. व त्यांच्या खात्यात 15 हजार 700 रुपये जमा झाले नाहीत. त्यांनी टपाल नाका येथील ओळखीच्या व्यापार्यांकडे साहिल ट्रेडर्स नावाच्या दुकानाची चौकशी केली असता दुकान नसल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किशोर यांनी गुन्हा दाखल केला.