खारघर मधून पोलिसाचीच गाडी चोरीला..
खारघर मधून पोलिसाचीच गाडी चोरीला..

पनवेल, दि.६ (वार्ताहर) ः खारघर मध्ये वास्तव्यास असलेले पोलीस उपनिरीक्षकांचीच दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 
खारघर सेक्टर 3 मध्ये अनमोल दर्शन सोसायटीत राहणारे पोलीस उपनिरीक्षकांनी आपल्या घरसमोर दुचाकी एमएच.45 , एक्स . 8690 हि दुचाकी पार्क केली होती. चोरटयांनी हि गाडी घराखालून चोरली आहे. खारघर मध्ये नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहने चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र या घटनेत खुद्द पोलिसांचीच गाडी चोरीला गेल्याने शहरातील वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुचाकीचे मालक हे नवी मुंबई मधील तुर्भे पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. चोरी गेलेल्या दुचाकीची फिर्याद त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यादृष्टीने खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.चोरीच्या घटना याठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात देखील कैद झाली आहे.
Comments