दापोली पुष्पक नगर जवळ गाडी जळून खाक...
पनवेल, दि.३ (वार्ताहर) ः सिडकोच्या हद्दीतील दापोली पुष्पक नगर रस्त्यावर एक सॅलोरो सी.एन.जी.गाडीने अचानक पेट घेतल्याने सदर गाडी जळुन खाक झाली.

पनवेलजवळील नव्याने वसलेले दापोली येथील पुष्पक नगर रस्त्यावर मारूती कंपनीची सॅलॅरो कार उरण येथुन पनवेलकडे येत असता गाडीने अचानक पेट घेतला याबाबत सिडको अग्नीशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी येऊन फायरमन प्रफुल्ल पाटील (ड्रायव्हर ऑपरेटर), समीर म्हात्रे, लीडींग फायरमन उमाकांत पाटील, जे.के.पाटील, अभिजीत नावलगी, वाय.टी.शिंदे यांनी जीकरीचे प्रयत्न करून आग तात्काळ आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला घटनास्थळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता सिडको अग्नीशमन विभागात अतिशय कार्यतत्पर अधिकारी व कर्मचारी स्टाफ असल्याने अशा घटनाप्रसंगी कॉल येताच सर्वात प्रथम सिडको अग्नीशमनच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी हजर होतात असे घटनास्थळी असलेलेले नागरीकांत बोलले जात होते.

फोटो ः जळालेली गाडी.

Comments