पनवेल, दि.१७ (वार्ताहर) ः तालुक्यातील नेरे येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशीन तोडून नुकसान केल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरे येथील एका गाळ्यात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचे कोणीतरी तोडून नुकसान केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी अज्ञात चोरट्याने रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशीनचे नुकसान केले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.