पनवेल, दि.30 (संजय कदम) ः कोबी भाजीच्या खाली कोणत्यातरी प्राण्याचे मास ठेवून त्याची वाहतूक करणार्या महिंद्रा बोलेरो माल वाहतूक गाडीवर कामोठे पोलिसांनी कारवाई करून या प्रकरणी आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
आरोपी मुसा मुल्ला (25 रा.पुणे) हा रात्रीच्या वेळी पनवेल जवळील पुरुषार्थ पेट्रोल पंपासमोरील ब्रीजच्या पुणे-मुंबई या लेनवर असणार्या सर्व्हीस रोडवर गाडी घेवून जात असताना गाड्यांचे पास लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तपासणी करत असताना महिंद्रा बोलेरो माल वाहतूक क्र.एमएच-09-ईएम-9738 वरील चालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असतानाही तो न थांबल्याने त्याचा पाठलाग करून त्यास पुरुषार्थ पेट्रोल पंपासमोरील सर्व्हीस रोडला थांबवून वाहनाची तपासणी केली असता कोबीच्या भाजीच्या खाली अवैधरित्या विक्री करण्यासाठी कोणत्या तरी प्राण्याचे मास घेवून जात असताना मिळून आल्याने सदर आरोपी विरोधात मानवी जीवनास धोकादायक असलेल्या तसेच भादवी कलम 269, 270 271, 429, प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (ठ) प्रमाणे कारवाई करून जवळपास बोलेरोसह 4 लाख 40 हजाराचा ऐेवज हस्तगत करण्यात आला आहे.