घरफोडीत मोबाईलसह रोख रक्कम लंपास
घरफोडीत मोबाईलसह रोख रक्कम लंपास

पनवेल, दि.२ (वार्ताहर) :-   बंद घरात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत मोबाईलसह रोेख रक्कम चोरुन नेल्याची घटना नावडे फेज-2 येथे घडली आहे.

नावडे फेस टू येथील सुखकर्ता अपार्टमेंट मध्ये राहणारे धीरज आगरे हे मोबाईलवर चित्रपट पाहत बसले होते. मोबाईल चार्जिंगला लावून ते हॉलमध्ये झोपी गेले. यावेळी त्यांच्या घरात शिरून चोरट्याने मोबाईल आणि पैसे चोरी केले. या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments