देशी-विदेशी मद्यसाठा हस्तगत...
देशी-विदेशी मद्यसाठा हस्तगत

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल जवळील वडघर सेक्टर 1 परिसरात काही इसम देशी-विदेशी मद्यसाठा करून त्याची विना परवाना विक्री करीत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच त्या ठिकाणी विशेष पथकाने जावून कारवाई केली आहे.
 कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याचे माहिती असून देखील काहीजण देशी-विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती वपोनि अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने त्या ठिकाणी जावून आरोपीला ताब्यात घेवून त्यांच्याकडून 1244 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) सह भादवी कलम 188, 270 सह साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 (3) प्रमाणे कारवाई केली आहे.
Comments