वैशाली जगन्नाथ जगदाळे यांचा अभिनव उपक्रम; रद्दी शालेय पाठ्यपुस्तकांची हजारो पालकांनी केली अदला - बदली


पनवेल दि.25 (वार्ताहर)- शैक्षणिक वर्ष संपले की ती पाठ्यपुस्तक आता रद्दीत दिले जातात. परंतु ही पुस्तक दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी वापरले जाऊ शकतात. याचे महत्त्व कामोठे येथील एका शिक्षिकेने समाज माध्यमातून अनेक पालकांना पटवून दिले. त्यामुळे आता या पुस्तकांची 
आदला - बदली करून लाखो रुपयांचा खर्च खऱ्या अर्थाने वाचण्यात आला आहे. त्याचबरोबर यातून पुस्तकांचे महत्त्व पटवून देण्यामध्ये संबंधित शिक्षिकेने यश मिळवले आहे.      

2020-21या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन  शिक्षण चालू झाले. आयसीएसई, सीबीएससी, स्टेट बोर्डचे सर्व वर्ग  आॅनलाईन  चालू झाले. शेवटी  शिक्षणमंत्र्यांनी कोविड मुळे सर्व परीक्षा रद्द केल्या. दहावीची सुद्धा परीक्षा यावर्षी घेण्यात येणार नाही. शौक्षणिक फी, पुस्तके , कपडे यासाठी पालकांनी खर्च कसाबसा केला. कोरोनामुळे केवळ  जागतिक महामारी निर्माण केली नाही. तर आर्थिक पेच निर्माण केला. यामुळे कित्येकांचा नोकऱ्या गेल्या, याशिवाय उद्योग व्यवसाय सुद्धा बुडाले. परिणामी उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न प्रत्येक कुटुंबियांना समोर उभा राहिला. हे सर्व करत असताना आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी कित्येक पालकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या वैशाली जगन्नाथ जगदाळे यांनी एक दिवस समाज माध्यमांवर आपल्या  मैत्रिणीशी बोलताना  आॅनलाईन  शिक्षण प्रणाली विषयी चर्चा केली. बोलता बोलता त्यांच्या मैत्रिणीने आम्ही मुलांची पुस्तके विकत न घेता शाळेमध्ये दिले जातात असे सांगितले. हे ऐकून जगदाळे यांना आपले शालेय जीवन आठवले. त्यांनी सुद्धा शिक्षण घेत असताना रिटर्न बेसवर पुस्तके वापरले होते. वैशाली जगन्नाथ जगदाळे या संकल्प फाउंडेशन चालवतात. त्या़च्या  ग्रुप वर त्यांनी कोणाला पुस्तके हवी आहेत  का असा मेसेज पाठवला. त्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी त्यांना विविध क्षेत्रातील ओळखी  अनोळखी मित्र मैत्रीणीनी मदत केली. जयश्री झाले, नवनाथ भोसले, तुषार सावंत, संकल्प फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष रुपाली कदम, ललिता इनकर, सुषमा घाडगे असे बरेच जण जोडले गेले. कामोठे येथील भाजपचे स्थानिक नेते के. के. म्हात्रे यांनी सुद्धा आपल्या मुलांचे पुस्तके दिली.  "पालक कमिटी बुक ऑफ एक्सचेंज फ्री ऑफ कॉस्ट"  या नावाने वैशाली जगदाळे यांनी तीन गृप तयार केले . सर्व शाळांच्या पालकांना लिंक जाॅईन केली.  ही लिंक गुगल फाॅर्ममध्ये तयार करण्यात आल्याने त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.खारघरमधील  संजय त्रिवेदी, आशिष म्हात्रे, ललिता इनकर, संजय गोधळी, मच्छिंद्र कणसे  यांनी वेळोवेळी मार्गदर्शक केले. प्रतिभा ताई यांची सोबत मिळाली, सर्व प्रथम गिरिजा आश्रमातील मुलांना ९ वी १०वी ची पुस्तके या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. जवळपास  साडेतीन हजार पालकांनी पुस्तके आदला बदली करण्यासाठी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. जूनियर केजी पासून ते बारावी पर्यंत सर्व बोर्डाची यावर्षीची पुस्तक इतर विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांची पुस्तक मागील वर्गातून पुढच्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता पुरवण्यात आली. केवळ नवी मुंबई पनवेलच नव्हे तर  प्रामुख्याने पुणे, नाशिक, सातारा,येथे हा  उपक्रम चालू आहे. सरासरी ३५०० मुलांना याचा फायदा झाला असल्याचे संकल्प फाउंडेशन कडून सांगण्यात आले.
पाठ्यपुस्तकांची मोफत देवाण-घेवाण संकल्प फौंडेशनच्या अध्यक्षा वैशाली जगदाळे यांनी ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे. या माध्यमातून हजारो पालकांनी पाठयपुस्तकाची देवाण घेवाण केली. विशेष म्हणजे यासाठी एक रुपयाही खर्च झाला नाही. पुस्तकांसाठी पालकांच्या खिशाला जी दरवर्षी कात्री लागत होती ती यंदा लागणार नाही. त्याचबरोबर "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ"  या वाक्याप्रमाणे एकमेकांना मदत आणि सहकार्य करण्याची भावना  या उपक्रमातून अधिकाधिक बळकट झाली आहे.

कोट :  आपल्या पालकांची सरत्या शैक्षणिक वर्षाची पुस्तक आपण रद्दीमध्ये देत असतो. दर वर्षी विद्यार्थ्यांना पालक नवीकोरी पुस्तकं विकत घेऊन देतात. जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर फारसा केला जात नव्हता. परंतु आम्ही संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून पालकांना समाज माध्यमांवर आवाहन केले. त्यामुळे पुस्तकांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात झाली. यातून पाठ्यपुस्तकासाठी लागणारा खर्च कोरोना वैश्विक संकटात वाचवता आला याचे मनोमन समाधान वाटते. गेल्या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे जवळपास  सर्व विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक अगदी नवीन कोरी राहिले. त्याचबरोबर यावर्षी अभ्यासक्रम न बदलल्याने संबंधित पुस्तकांची देवाणघेवाण करता आली. हा उपक्रम इतर ठिकाणी सुद्धा राबवला जात असल्याबद्दल खऱ्या अर्थाने आनंद झाला आहे. असे वैशाली जगन्नाथ जगदाळे यांनी सांगितले (अध्यक्ष संकल्प फाउंडेशन)
           

Comments