गुन्हे शाखा कक्ष 3 ने केला गुटख्यासह देशी-विदेशी मद्यसाठा हस्तगत...
गुन्हे शाखा कक्ष ३ ने केला गुटख्यासह देशी-विदेशी मद्यसाठा हस्तगत

पनवेल, दि.12 (संजय कदम) ः कामोठे वसाहतीमध्ये बेकायदेशीररित्या गुटख्यासह देशी-विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री करणार्‍या दोघा जणांविरुद्ध गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने कारवाई करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा हस्तगत केला आहे.
कामोठे वसाहतीमधील ब्ल्यू हेवन बिल्डींगच्या कंपाऊंडमध्ये सेक्टर 35 या ठिकाणी बेकायदेशीररित्या केशयुक्त गोवा, तसेच इतर प्रकारचे गुटखे, त्याचप्रमाणे मॅकडोल्ड व इतर मद्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक इर्शान खरोटे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे कक्ष 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे, पोलीस नाईक दिनेश जोशी, राजेश मोरे, सुधीर पाटील आदींच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून आरोपी करण सचदेव (24) व नितीन सचदेव (25) यांना ताब्यात घेवून सदर मुद्देमालासह रोख रक्कम असा मिळून जवळपास 8620 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments