जागतिक महिला दिन --- लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७o महिलांचा सन्मान...
पनवेल / प्रतिनिधी :-  श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व पनवेल मिडीया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७० महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
      
पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री.  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवार दि. ८ मार्च २०२१ रोजी सकाळी १०. ३० वाजता होणार्‍या कर्तृत्ववान महिला गौरव समारंभास लोकनेते रामशेठ ठाकूर, जेष्ठ पत्रकार, साहित्यिक निला उपाध्ये, सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.
             
या महिला गौरव समारंभात समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार आहे. वैद्यकीय, वकील, स्वच्छता दूत, नर्स, समाजसेवा, साहित्य, शिक्षक, एस.टी.वाहक, रिक्षा चालक, पिग्मी एजंट आदी क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेे पनवेल मिडीया प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार गणेश कोळी यांनी सांगितले.  
Comments