सोसायटी नाका परिसरात आढळला मृतदेह


पनवेल, दि.२३ (संजय कदम) ः शहरातील सोसायटी नाका परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे, उंची ५ फूट ३ इंच, रंग सावळा, डोळे काळे, चेहरा उभट, शरीर बांधा मध्यम, नाक सरळ, डोक्याचे केस वाढलेले असून, अंगावर कपडे नाहीत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.निरीक्षक शिवाजी हुलगे यांच्याशी संपर्क साधावा.
Comments