जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्यावतीने महिला पत्रकारांचा सन्मान..
पनवेल(प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्यावतीने रविवार दिनांक ०७ मार्च रोजी  महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
        
पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता हा सन्मान कार्यक्रम मंचाचे अध्यक्ष माधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने दरवर्षी रा. जि. प च्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याबरोबरच शाळांना डिटीजल करण्याच्या दृष्टीने ई लर्निंग संच, कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी, कर्तृत्वान  महिलांचा सत्कार, मातृभाषा दिन, ब्लॅंकेटचे वाटप, अन्नधान्य वाटप असे व इतर उपक्रम  यशस्वीरित्या पार पाडले जातात. सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्याबरोबरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रींच्या लेकींचा सत्कार, महिला दिनानिमित्त विविध शासकीय विभागातील कार्यक्षम महिलांचा सत्कार करून प्रेरणा घेतली जात असतानाच महिला सक्षमीकरणाची आग्रही भूमिका मांडणाऱ्या आणि पत्रकारिता या आव्हानात्मक क्षेत्रात कुटुंबाला सांभाळून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पत्रकारांचा  सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे सरचिटणीस मंदार दोंदे यांनी दिली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image