पनवेल / वार्ताहर :- जागतिक ग्राहक दिनानिमित्त दि. १५.०३.२०२१ रोजी अन्न व औषध प्रशासन , म. रा. रायगड पेण द्वारे गुगल मीट वेबिनार आयोजीत करण्यात आला. सदर वेबिनार मध्ये रामसिंग एफ. राठोड उप नियंत्रक वैधमापन शास्त्र, रायगड जिल्हा यांनी वैधमापन शास्त्र कायद्यामधील तरतुदी व ग्राहकांचे हित यावर प्रबोधन केले. वस्तू व सेवा खरेदी करताना ग्राहकांचे अधिकाराबाबत तसेच अधिकारांचा भंग झाल्यावर दाद कुठे व कशी मागवावी याबाबत मार्गदर्शन केले.
जेष्ठ फार्मासिस्ट संतोष घोडींदे ,पनवेल यांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावरून औषधे खरेदी करताना, हाताळताना कोणती काळजी घ्यावी याबाबत विवेचन दिले. प्रशासनातील वरीष्ठ औषध निरीक्षक डॉ. मुकुंद डोंगळीकर यांनी औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण आदेश, नारकोटीक्स ड्रग्स कायदा या कायद्यामधील तरतुदीबाबत सखोल विवेचन केले.
या वेबिनारचे प्रास्ताविक व समारोप अन्न व औषध प्रशासनाचे गि. दि. हुकरे, सहा.आयुक्त (औषधे) रायगड यांनी केले. अनेक ग्राहक, औषधे विक्रेते व व्यापारी मंडळींनी या वेबिनारचा फायदा घेतला.