स्नेहल संजय रानडे 'रणरागिणी आदर्श महिला' पुरस्काराने सन्मानित...
पनवेल / वार्ताहर :- जागतिक महिला दिनानिमित्त ह्यूमन राईट इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने  एकात्मिक बाल विकास योजनेच्या निवृत्त अधिकारी व पनवेलच्या रहिवासी स्नेहल संजय रानडे यांना 'रणरागिणी आदर्श महिला' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

बालक व महिलांच्या उत्कर्षासाठी सातत्याने त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून पुणे येथे हा पुरस्कार सोहळा झाला मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी पुरस्कार प्रदान केला. 

Comments