आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातर्फे "सक्षम नारी, सुरक्षित नारी" व्याख्यानाचे आयोजन....
 
पनवेल / वार्ताहर :- दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, विद्यालयात खांदा काॅलनी, पनवेल येथील पोलीस स्टेशन मधील पोलिस प्रतिनिधींच्या उपस्थितीत "सक्षम नारी, सुरक्षित नारी" या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी उपस्थित पी एस आय मा. किरण वाघ, महिला पोलीस हवालदार मा. हर्षला पाटील, मा. धनवे, पोलीस अंमलदार मा. अलिफ बेग व शिवसेना उपमहानगर संघटिका मा.मंदा जंगले यांचे स्वागत विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका मा समिता सोमण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
मा.किरण वाघ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ऑनलाईन शिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित रहावे, यासाठी योग्य खबरदारी घ्यावी." असे आवाहन केले. मा. धनवे व मा. मंदा जंगले यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित व सक्षम वातावरणासाठी काय कराल याबाबत माहिती दिली. 
विद्यालयात कार्यरत निर्भया समितीमधील कायदेशीर सल्लागार ऍड मा. शुभांगी शेलार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला. 
निर्भया समितीच्या शिक्षक सदस्या सहाय्यक शिक्षिका रचना पाटील यांनी सुरक्षित शैक्षणिक वातावरणासाठी विद्यालयातील निर्भया समिती मार्फत सुरू असलेले कार्य स्पष्ट करून उपस्थितांचे आभार मानले. 
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी केले.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image