पनवेल :- नवी मुंबई पोलिस कमिशनरेट व रिजनल ट्रांसपोर्ट ऑफिस (RTO) यांनी रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत घेतलेल्या सयकलोथॉन मध्ये पनवेल येथील आर्थिक सामाजिक दृष्टया वंचित मुलांना, शारीरिक व मानसिक दृष्टया सुदृढ बनण्याची संधी दिली.
आय. पी. एस. डि. सी. पी. ट्राफीक पुरुषोत्तम कराड यांनी स्वत: या इव्हेंट मध्ये लक्ष घालून, मुलांचा आत्मविश्वास वाढवला. तसेच काल १८ मार्च रोजी, सिनीयर इंस्पेक्टर अभिजीत मोहिते व टीमने या मुलांचे प्रश्न समजून घेतले व त्यांना उज्वल भविष्याची शाश्वती दिली.
तसेच सदर कार्यक्रमासाठी प्राजक्ता शहा यांचे मोलाचे योगदान लाभले.
नवी मुंबई पोलीस कमिशनरेट व आर टी ओ यांनी सुरक्षा अभियानांतर्गत घेतलेल्या सयकलोथॉन मध्ये वंचित मुलांना सुदृढ बनवण्याची संधी..