घरफोडीसह बॅटऱ्या व टायर चोरी करणारी दुक्कली गजाआड...
पनवेल / (वार्ताहर)- पनवेल शहरात घरफोडीसह एका टेंपोची बॅटरीसह टायर चोरणाऱ्या दुक्कलीस पनवेल शहर पोलिसांनी वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून घरफोडीचा माल हस्तगत केला आहे.
        
सुरेखा भेंडे (रा.-लाईन आळी, पनवेल) यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा उचकटून आरोपी रवी राजू आरकेरी (वय-२५) रिक्षा चालक व त्याचा सहकारी अर्जून गायकवाड (वय-५८, रा.-अंबरनाथ) यांनी तिच्या घरातील सोन्याचांदीच्या वस्तू व इतर साहित्य व रोखरक्कम असा मिळून १५, ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरला होता. त्याचप्रमाणे डेरवली येथील देवराम ढोंबरे यांच्या टाटा टेंपोतील बॅटऱ्या व टायर असा मिळून जवळपास १०, ००० रुपये किंमतीचा माल तसेच सुभाष शिंदे यांच्या जयश्री महालक्ष्मी कॉस्मेटिक दुकानातील टॉवेल, पॅंटीज व इतर साहित्य असा मिळून जवळपास २०,४२५ रुपयांचा ऐवज चोरला होता. 

याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल होताच पो उप आ, परी २. पनवेल. शिवराजपाटील, सपोआ, नितीन भोसले-पाटील पनवेलविभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व  पोनि गुन्हे  संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली पो उप  निरी सुनिल तारमळे , पोहवा रवींद्र राऊत   ,पोना परेश म्हात्रे , पोशि सुनिल गर्दनमारे ,पोशी यादवराव घुले, पोना युवराज राऊत ,पोशी विवेक पारासूर आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे या दोन सराईत गुन्हेगारांना रिक्षा व गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांसह जवळपास १,८१,५०० रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबत पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.
       
फोटो- आरोपींसह पोलीस पथक
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image