आर एस पी नवी मुंबई युनिट मार्फत राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी यशस्वीरित्या पार
" कमांडंट विलास डी पाटील यांचे नेतृत्व "
नवीन पनवेल / वार्ताहर :- दिनांक ५ मार्च ते ८ मार्च दरम्यान झालेल्या शासकीय राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच पनवेल मध्ये जे एन पी टी  पळस्पे या ओव्हर ब्रीज महामार्गावर घेण्यात आल्या सदर स्पर्धा पनवेल महानगरपालिका व पोलीस आयुक्तालय नवीमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. आत्ताच झालेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात आर एस पी युनिट नवीमुंबई मार्फत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी मुळे चार दिवसांसाठी होणा-या या राष्ट्रीय स्पर्धेची महामार्गावरील वाहतूक नियंत्रणाची संपुर्ण जबाबदारी पोलीस आयुक्तालय नवीमुंबई वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सदर स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या महामार्गाची वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी आर एस पी युनिट नवीमुंबईवर सोपविण्यात यावी या बाबतीत राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धां आयोजन समितीस सुचविण्यात आले. या बाबतीत पोलीस विभागा मार्फत खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शतृघ्न माळी यांनी आर एस पी चे नवीमुंबई चे कमांडंट विलास डी पाटील यांची भेट घेऊन सदर नियोजन देण्यात आले.
        
चार दिवस झालेल्या या स्पर्धेच्या बंदोबस्तासाठी आर एस पी कमांडंट विलास डी पाटील यांच्या नेतृत्वात २० आर एस पी महिला शिक्षिका अधिकारी व ५० आर एस पी शिक्षक अधिकारी सहभागी झाले सदर स्पर्धा सकाळी सहा वाजता सुरू होणार होत्या यासाठी महामार्गावर बेरिकेट लाऊन बंद करण्या पासून  महामार्गावरील सर्व सव्हिस रोड वरील सर्व बंद करून तेथे बंदोबस्तासाठी सर्व आर एस पी टीम सकाळी साडे पाच वाजता उपस्थित राहुन सकाळी ६ वाजता महामार्ग बंद करण्या पासून सदर महामार्ग वेळतच स्पर्धेसाठी तयार करून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. 
यामुळे चार दिवसांत या राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा कोणत्याही व्यत्ययाविना अगदी सुलभपणे पार पाडता आर एस पी कमांडंट विलास डी पाटील यांच्या नेतृत्वा आर एस पी युनिट मार्फत महिला व पुरुष यांनी तळपत्या उन्हात दिलेले हे योगदान खुपचं उल्लेखनीय असुन या स्पर्धा आयोजन राष्ट्रीय समिती, सायकलिंग फेडरेशन तसेच पोलीस विभागा मार्फत ड्युटी उपस्थित सर्व आर एस पी युनिटसह श्री विलास डी पाटील यांचे खुप खुप अभिनंदन करण्यात आले. या पार पाडलेल्या यशस्वी कामगिरी बद्दल राष्ट्रीय स्पर्धा आयोजन समिती मार्फत राष्ट्रीय विशेष कामगिरी बद्दल प्रत्येक सहभागी आर एस पी शिक्षक व शिक्षिका यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.






Comments