टीजेएसबी सहकारी बँक लि. नवीन पनवेल शाखेचा उपक्रम"
पनवेल :- समाजामध्ये अनेक असे महिला उद्योजिका आपला उद्योग उत्तम प्रकारे हाताळतात. आपलं संसार, घरातील सर्व माणसे कुटुंबीय हे सांभाळून सुद्धा उद्योगांमध्ये सुद्धा प्राविण्य मिळवतात. त्यासाठी लागणारे भांडवल हे आता बँकेमार्फत सहजतेने उपलब्ध होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टीजेएसबी सहकारी बँक, नवीन पनवेल शाखेच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पनवेलच्या प्रथम नागरिक महापौर डॉ.कविता चौतमल या बोलत होत्या. पाहायला गेलं तर अमेरिकेमध्ये एक चळवळ सुरू झाली, तिथे महिलांना बारा तास काम करावं लागत होतं त्याच्याविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारलं आणि त्यामध्ये त्यांना यश येऊन त्यांच्या कामाचा जो वेळ कमी झाला. त्याचा आनंद म्हणून त्यांनी जागतिक महिला दिन साजरा करू लागले.
आपल्याकडे महिलादिन साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे वेगळा, आपल्या येथे महिला शिकते, ती घराबाहेर पडते ,वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवून त्या समाजाला आणि देशाला सुद्धा पुढे नेतात; असे अनेक उदाहरणे देऊन महापौर डॉ. कविता चौतमल यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बँकेच्या महिला ग्राहकांना, सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महिलांना मार्गदर्शन केले.
समाजामध्ये महिलांच्या कौटुंबिक अत्याचाराविरोधात तसेच बाल गुन्हेगार व त्यांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असलेल्या पनवेलच्या ऍड. शुभांगी झेमसे, बाल न्याय मंडळ, रायगड महाराष्ट्र शासन सदस्य यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या महिलांना त्यांना सामाजिक व कौटुंबिक अन्यायाविरोधात आपल्याला लढा देण्यासाठी कायदेविषयक अधिकार व त्याचं वापर याविषयी मार्गदर्शन केले. पेण नगरपालिका परिषद माजी नगरसेविका राहिलेल्या व सन २०१५-१६ रायगड भूषण पुरस्कार सन्मानित तसेच सन २०१५-१६ पनवेल गौरव पुरस्कार सन्मानित अशा थोर सामाजिक क्षेत्रातील महिला व बालकल्याण असे क्षेत्र हाताळणाऱ्या ऍड. शुभांगी झेमसे यांनी समाजातील महिलांना कौटुंबिक अन्याय व सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये घटस्फोट घेण्याचे वाढते प्रमाण व त्यावर कायदेविषयक मार्गदर्शन केले.
टीजेएसबी सहकारी बँक ,नवीन पनवेल शाखेत नुकताच हा ५ मार्च, २०२१ रोजी कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पनवेल च्या महापौर डॉ.कविता चौथमल ,महाराष्ट्र शासन सदस्य बाल न्याय मंडळ ,रायगडच्या एडवोकेट शुभांगी झेमसे, नवीन पनवेल शाखेचे सर्व कर्मचारी वृंद आणि महिला ग्राहक उपस्थित होत्या.
शेवटी टि जे एस बी सहकारी बँक पनवेल शाखेचे स्टाफ श्री प्रवीण वाघमारे यांनी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले.