पनवेल / दि.१ (वार्ताहर) :- बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ता. खालापूर, जि. रायगड यांच्या विद्यमाने चौक येथे बौद्धाचार्य श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरास प्रमुख मार्गदर्शक आद. एम डी सरोदे (गुरुजी) राष्ट्रीय महासचिव उपस्थितीत होते. या प्रसंगी आयु. कुणाल लोंढे. (करंजाडे पोलीस पाटील, ) प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे (रजि) आयु. बाळासाहेब वाघमारे (मार्गदर्शक ) आयु. सुशांत गायकवाड (खजिनदार ) नितीन मस्के (मार्गदर्शक ) आयु.गौतम अहिरे (मार्गदर्शक ) यांनी श्रामणेर शिबिरास भेट देऊन फळहार धम्मदान दिले व नवनिर्वाचित श्रामणेर यांचे आर्शिवाद घेतले.
फोटो :- बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेतर्फे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे करण्यात आलेले आयेाजन