को.ए.सो.शाळा चिरनेर SSC बॅच २००२ स्नेहमेळावा आयोजन तब्बल १९ वर्षांनी एकत्र..

             
पनवेल / वार्ताहर :- शालेय जीवन संपले की, शाळेतील मित्र वर्ग उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय ईत्यादी मुळे विखुरले जातात त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी, मित्रांच्या आठवणी असल्या तरी एकत्र येणे शक्य नसते. त्यात सांसारिक प्रपंच वाढल्याने सर्व जण व्यस्त होतात.
    आजच्या या Internet च्या युगात WhatsApp च्या माध्यमातून को.ए.सो.शाळा चिरनेर SSC बॅच 2002 चे सर्व शालेय मित्र- मैत्रिणीचे स्नेहमेळावाचे आयोजन बुधवार दि. 17 फेब्रुवारी 2021 रोजी दिघोडे येथील रिसॉर्ट वर केले होते. एकाच बेंच वर बसणारा, खोडकर, मस्ती करणारा माझ्या वर्गातील मित्र- मैत्रीण सर्व तब्बल 19 वर्षांनी एकत्र भेटले त्यामुळे सर्वांना आनंदाश्रूने  भरून आल्यासारखे झाले असेच या स्नेहमेळाव्यात सर्वांना झाले. सर्व शालेय मित्र-मैत्रिणींनी स्नेहमेळावाचे आयोजन खूप सुंदर केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वानीच खूप मेहनत घेतली होती.
Comments