पनवेल / दि.२० (वार्ताहर) :- आज दि.२० फेब्रुवारी रोजी राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि नितीन सरदेसाई तसेच शिरीष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या प्रयत्नाने यतीन देशमुख यांची मनसे पनवेल व नविन पनवेल शहराच्या अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे.
या नेमणुकीचे पत्र पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी यतीन देशमुख यांनी मनसेची ध्येय धोरणे व कार्यक्रम इत्यादी वेळोवेळी आपल्या क्षेत्रात निष्ठेने राबवावी. सदर नेमणूक ही एक वर्षाच्या कालावधीची असून आपल्या पदाचा कार्यअहवाल पाहूनच पुढील मुदत वाढ संदर्भात निर्णय घेतला जाईल आदी विषय त्यांच्या नेमणुकी पत्रकात लिहिण्यात आले आहेत. तरुण कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोट
ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू व राज साहेब जे आदेश देतील त्यांचे पालन तंतोतंत करू व पक्ष वाढीस प्रयत्न करू ः यतीन देशमुख
फोटो :- राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना यतीन देशमुख व इतर मान्यवर.