मांडूळ सापाची विक्री करण्यासाठी आलेला आरोपी गजाआड...

पनवेल, दि.२४ (वार्ताहर) :- मांडुळ सापामुळे धनदौलत व ऐश्‍वर्य प्राप्त होते असे अमीष लोंकाना दाखवुन त्यांना मोठया किंमतीत मांडुळ सापाची विकी करून लोकांची फसवणुक करत असुन तो मांडुळ जातीचे दुतोंडी सर्प विकी करण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्याला मांडूळ सापासह गजाआड केले आहे.

आरोपी किशोर गोविंद पाटील हा मांडुळ सापामुळे धनदौलत व ऐश्‍वर्य प्राप्त होते असे आमीष लोंकाना दाखवुन त्यांना मोठया किंमतीत मांडुळ सापाची विकी करून लोकांची फसवणुक करत असुन तो मांडुळ जातीचे दुतोंडी सर्प विकी करण्यासाठी द काऊन बिल्डींग जवळ येणार आहे. त्याने सर्पाची किंमत 25 कोटी सांगीतली आहे अशी खात्रीशीर माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच  पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह सो, पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव सो, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी.जी शेखर पाटील सो, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, परि-2, पनवेल,  सहा. पोलीस आयुक्त नितीन भोसले यांना माहीती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण विभागाचे पोउपनि बेलदार यांना पंच साक्षीदांना बोलावुन घेण्यास सांगीतले व पंचाना माहीती समाजावून सांगितली. पंच सोबत येण्यास तयार झाल्याने वपोनि माळी यांनी व मपानि बिडवे, पोलीस उप निरी बेलदार तसेच स्टाफ व पंच असे साध्या वेशात खाजगी वाहनातून मिळालेल्या बातमी ठिकाणी गेले व सापळा लावुन थांबले असता एक इसम बिल्डींगचे बाहेर पडणार्‍या गेटजवळ साधारण २.१५ वाजण्याच्या सुमारास पांढर्‍या व गुलाबी रंगाची हॅन्डबॅग खांदयावर लटकवुन आत जात असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा बातमीदाराचे इशार्‍यावरून वपोनि माळी व पोउपनि बेलदार असे त्यास ताब्यात घेण्यास पुढे जात असतांना त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जावू लागला. पोलीसांनी त्यांस पळण्याची संधी न देता ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्याने त्याचे नाव किशोर गोविंद पाटील, वय 40 वर्ष, व्यवसाय मॅकेनिक, रा. मु. दलोंडे, पो. दिगाशी, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे असे सांगीतले. त्याचे ताब्यातील बॅग मध्ये काय आहे याची पंचासमक्ष खात्री केली असता त्यात तपकिरी रंगाचे दुतोंडी मांडुळ सर्प असल्याचे आढळुन आले त्याबाबत त्याचेकडे चौकशी करता त्याने सागितले की, मांडुळ साप घरात ठेवल्यास धनदौलत ऐश्‍वर्य प्राप्त होते अशी लोंकाची भावना असल्यामुळे बरेचसे लोक मांडुळ साप मोठया रक्कमा देवुन खरेदी करतात. त्यामुळे द काऊन बिल्डींग, ऑफिस नं. १००४, से. १५ खारघर येथे मांडुळ साप विकी करून त्यातुन मिळणारे रक्कमेतून हॉटेल व्यवसाय काढण्याचा प्लॅन असल्याचे सांगीतले. सदर सर्प पंचासमक्ष ताब्यात घेतला असुन त्याची लांबी १५२ से.मी. त्याचे वजन ०५ किलो २४० ग्रॅम भरले असुन त्याची बाजाराभावाप्रमाणे किंमती २ कोटी रूपये आहे. सदर सर्प पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन त्याबाबत खारघर पोलीस ठाणेत भादवि कलम ४२०, ५११, सह वन्य जीव प्राणी १९७२ चे कलम ५१, ५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यात आरोपी इसमास अटक कल आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह सो, मा. सह. पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव सो, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी.जी शेखर पाटील सो, मा. पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, परि-२, पनवेल, यांचे मार्गदर्शनाखाली खारघर पोलीस ठाणेचे वपोनि शत्रुघ्न माळी, मपोनि विमळ विडवे, पोउपनि नरेंद्र बेलदार, व खारघर पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि बेलदार हे करीत आहे.
Comments