पनवेल सायन महामार्गावरील अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याचे सा. बा राज्यमंत्र्यांचे आदेश

पनवेल, दि.२२ (वार्ताहर) :-  पनवेल - सायन महामार्गावर अपघात रोखण्यासाठी खाडीपूल येथे प्रसरण पावलेल्या  सांध्यांची दुरुस्ती, भुयारी पादचारी मार्ग तसेच पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीच्या या अनुषंगाने आवश्यक त्या उपायोजना करा असे आदेश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकार्‍यांना दिले. राष्ट्रवादीचे खारघर शहराध्यक्ष बळीराम नेटके यांच्या मागणीनुसार बैठक संपन्न झाली. त्यावेळी राज्यमंत्र्यांनी अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या रस्त्यावरील समस्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई विभागाचे मुख्य अभियंता के. टी. पाटील, अधीक्षक अभियंता सु. ल. टोपले, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे मुख्य अभियंता संदीप पाटील यांच्यासह खारघर येथील बळीराम नेटके,शहबाज़ पटेल आदी उपस्थित होते. पनवेल सायन महामार्गावर कामोठे खाडीपूल व तळोजा खाडीपूल येथे रस्त्यालगत घळई निर्माण झाल्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रसरण सांध्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. या अनुषंगाने तांत्रिक मान्यता देऊन तात्काळ काम पूर्ण करावे, असे निर्देश राज्यमंत्री  भरणे यांनी दिले. सायन पनवेल महामार्गावरील भुयारी पादचारी मार्गांची कामे व्यवस्थित न झाल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात पाणी सांडते. त्यामुळे त्याचा वापर करता येत नसल्यामुळे मुख्य महामार्गावरुन रस्ता ओलांडला जात असून अपघाताचा धोका वाढतो. तसेच पादचारी पुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची  तरतूद असताना प्रत्यक्षात लिफ्ट बसवण्यात आल्या नाहीत. या महामार्गावर पथदिवे बंद असल्यानेही अपघाताचा धोका वाढतो, आदी बाबी या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्यमंत्री  भरणे यांनी यावेळी दिली.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image