नवी मुंबई परिवहन सेवेच्या कर्मचारी कामगार सेनेच्या नामफलकाचे उद्घाटन....

पनवेल / वार्ताहर :- नवी मुंबई परिवहन सेवेच्या कर्मचारी कामगार सेनेच्या नामफलकाचे उद्घाटन नवी मुंबई परिवहन समिती सदस्य समिर बागवान व  शिवसेनेचे पनवेल उपमहानगर प्रमुख लिलाधर भोईर यांच्या हस्ते झाले.

यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी कामगार सेनेचे सभासद आणि कामगार उपस्थित होते. आसुडगाव युनीटचे अध्यक्ष विवेक घाडगे, संयुक्त सरचिटणीस शहाजी शिंदे, शाखा प्रमुख रघुनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.
 सदर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन शहाजी शिंदे यांनी केले.
Comments