सद्गुरू श्री साई नारायणबाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त समाजोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन ...

पनवेल / प्रतिनिधी : -
सद्गुरू श्री साई नारायणबाबा यांच्या ८५ व्या जन्मोत्सवानिमित्त दि. १४ ते २० फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पनवेलच्या श्री भगवती साई संस्थान व श्री साई नारायणबाबा आश्रम येथे विविध समोजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात येते परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
       १४ फेब्रुवारी रोजी १२ तास अखंड श्री साई महिमा पाठाचे वाचन, १८ फेब्रुवारी रोजी समाजातील गरीब मुलींचे निशुल्क सामुदायिक कन्यादान, १९ फेब्रुवारी रोजी सत्यनारायणाची महापुजा त्याचप्रमाणे गरीब व गरजू १००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, जेवण, गरजू वस्तू दिल्या जाणार आहेत. २० फेब्रुवारी रोजी सद्गुरू श्री नारायणबाबा यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन तसेच १४० गरीब व गरजू विधवा महिलांना धान्य वाटप तसेच होम हवन, महामंगल स्नान, तुलाभार, महाचरण पुजा, पुष्प अभिषेक, महाआयुष होम आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री साई नारायणबाबा आश्रमाचे अध्यक्ष खेमचंद गोपलानी, सेक्रेटरी रामलाल चौधरी, कोऑर्डिनेटर राम थंदानी यांनी सांगितले.  
Comments