मा. उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने नवीन पनवेल से. २ व ३ मध्ये फुटपाथच्या कामाला सुरवात..
पनवेल, दि. २५ (वार्ताहर) :-  नवीन पनवेल येथील सेक्टर २ आणि ३ मधील नागरिकांनी फुटपाथच्या होत असलेल्या दुर्दशा बद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे समस्या मांडली होती; नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सदर विषयाची गंभीर दखल घेत सिडकोच्या अधिकार्‍यांना फुटपाथ बनवण्यासाठी पत्र दिले आणि सतत पाठपुरावा करून फुटपाथ बनवण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून घेतली.
माझा प्रभाग माझी जवाबदारी या अनुषंगाने काम करणारे नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभाग १८ मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवत असतात. आरोग्य, साफ सफाई, पाणीपुरवठा, लाईटचा विषय असो की रस्ते आणि फुटपाथ बांधणे विषय असो, जो पर्यंत समस्येचे निरसन होत नाही तो पर्यंत पाठपुरावा करत राहतात; त्याचाच प्रत्यय यानिमित्ताने पुन्हा आला आहे. नवीन पनवेल सेक्टर २ आणि ३ मधील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

फोटो :-  नवीन पनवेल येथील फुटपाथच्या कामाला सुरूवात
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image