शिवसेनेच्या प्रयत्नांना यश रेल्वे परीक्षा केंद्र नवी मुंबई रायगड मध्ये केल्याने परीक्षार्थींना दिलासा..
                     
पनवेल /वृत्तसेवा दि.१२ :- कोकण रेल्वेने दिनांक 3 फेब्रुवारी रोजी टेक्निशियन व इलेक्ट्रिशियन या पदाकरिता परीक्षा आयोजित केल्या होत्या. सदर परीक्षांचे केंद्र नागपूर औरंगाबाद या ठिकाणी ठेवण्यात आले होते हा कोकण रेल्वेच्या परीक्षा देणाऱ्या कोकण विभागातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या जिल्ह्यातील परीक्षार्थी वर अन्याय होत असल्याची व गैरसोय झाल्याची तक्रार परीक्षार्थींनी पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील यांच्यामार्फत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या निदर्शनास आणून दिली. व सदर परीक्षा रायगड नवी मुंबई उमेदवारांच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर घेण्याची मागणी केली होती.          

सदर मागणीची गंभीर दखल घेत जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी ज्येष्ठ शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांना सदर प्रकरणी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढण्याची सूचना दिली. गवळी यांनी कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता व कार्मिक अधिकारी के .के .ठाकूर यांच्याशी परीक्षार्थींच्या न्याय मागण्याची कैफियत मांडून सविस्तर चर्चा केली तसेच जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे लेखी निवेदनही चेअरमन संजय गुप्ता यांना पाठविण्यात आल होत. शिवसेनेच्या मागणी नुसार कोकण रेल्वेने 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या टेक्निशियन इलेक्ट्रिशियन या पदाच्या परीक्षा घेण्यासाठी रायगड नवी मुंबई त्या ठिकाणी परीक्षा केंद्राची उपलब्धता करून दिली. तसेच कोकणातील परीक्षार्थींना कोविड १९ ची गंभीर परिस्थितीचे अवलोकन करून त्यांच्या नजीक परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिल्याने सर्व उमेदवारांनी जिल्हाप्रमुख शिरीष घरत व शिवसेनेचे आभार मानले आहे.
Comments