नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून अज्ञात टोळीने तरुणाला घातला गंडा....
 
पनवेल, दि.८ (वार्ताहर) :- नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अज्ञात टोळीने सुमारे ५७ हजारांची रक्कम उकळून त्याची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या टोळी विरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.    

सदर प्रकरणात फसवणुक झालेल्या तरुणाचे नाव स्वप्नील बर्वे (२२) असे असून तो पनवेरलच्या डेरवली भागात कुटुंबासह रहाण्यास आहे. गत मे महिन्यामध्ये स्वप्नीलने बीटेकची परिक्षा दिल्यानंतर तो क्वालीटी ऑफीसर या नोकरीचा शोध घेण्यासाठी त्याने नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती भरली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच मनिषा नावाच्या महिलेने नोकरी डॉट कॉम मधून बोलत असल्याचे सांगून स्वप्नीलच्या मोबाईलवर संपर्क साधला होता. त्यानंतर सदर महिलेने अमूल मिल्क लिमिटेड कंपनीमध्ये क्वालीटी ऑफिसरची व्हॅकेन्सी असल्याचे सांगून त्यासाठी स्वप्नीलला १५५०/- रुपये रजिस्ट्रेशन फि भरण्यास सांगितले. त्यानुसार स्वप्नीलने रजिस्ट्रेशन फिची रक्कम गुगल पेद्वारे पाठवून दिल्यानंतर अग्निहोत्री नामक व्यक्तीने अमुल मिल्क लि.कंपनीकडून फोनवरुन इंटरव्हयु् घेत असल्याचे भासविले.  त्यानंतर दुसर्‍या दिवशी मनिषाने त्याला फोन करुन त्याची नियुक्ती झाल्याचे सांगून त्याच्या मेडिकल सेक्युरीटीसाठी ८,५००/-  रुपये, तसेच कंपनीसोबत बॉन्ड करण्यासाठी १२,५००/- रुपये स्वप्नीलला भरण्यास सांगितले. त्यामुळे स्वप्नीलने आपल्याला नोकरी नको, सर्व व्यवहार रद्द करण्यास तिला सांगितल्यानंतर मनिषाने सदर व्यवहार रद्द करण्यासाठी ४१९०/- रुपये भरल्यानंतर त्याची संपुर्ण रक्कम त्याला परत मिळेल असे सांगितले. सदर महिलेच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून स्वप्नीलने सदरची रक्कम तिच्या खात्यावर पाठविल्यानंतर मनिषाने नेटवर्कच्या अडचणीमुळे सदर रक्कम मिळाले नसल्याचे सांगून त्याला ५५८९/- इतकी रक्कम दुसऱया खात्यावर पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर देखील मनिषाने जीएसटी आणि सर्व्हीस टॅक्स अशी वेगवेगळी कारणे सांगुन त्याच्याकडून एकुण ५६ हजार ९७८ रुपये उकळले.  
त्यानंतर देखील स्वप्नीलने आणखी २३ हजार रुपयांची रक्कम भरल्यास त्याला कंपनीकडून १ लाख रुपयांचा चेक दिला जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर आपली फसवणुक होत असल्याचे स्वप्नीलच्या लक्षात आल्यानंतर त्यांने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या गुह्यातील आरोपींविरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image