महाविकास आघाडी शिष्टमंडळास महापालिका आयुक्तांचे कोविड रुग्णालय चालू करण्याचे आश्‍वासन..


पनवेल, दि. २४ (वार्ताहर) :-  पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लवकरच कोविड रुग्णालय सुरू करतो असे आश्‍वासन महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला आज दिले आहे.
आज आयुक्त सुधाकर देशमुख यांची महाआघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पनवेल उरण महाविकास आघाडीचे नेते आ.बाळाराम पाटील, अध्यक्ष पनवेल उरण महाविकास आघाडी बबनदादा पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस आर सी घरत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सतीश पाटील, सुदाम पाटील जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस, शिवदास कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, गणेश कडू जिल्हा सहचिटणीस शेकाप, निर्मला म्हात्रे महिला जिल्हाध्यक्षा काँग्रेस, लतीफ शेख शहर अध्यक्ष पनवेल, विजय भोईर युवा नेते शेकाप यांनी घेवून कोविड रुग्णालया संदर्भात तसेच मालमत्ता कर, कारडीओ रुग्णवाहिका व विविध विषयावर चर्चा केली असता त्यांनी पुढील आठवड्यात कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आश्‍वासन दिले व मालमत्ता कर संदर्भात सर्वपक्षीय नेते, महापौर, अधिकारी, सामाजिक संघटना व रहिवाशी यांची सयूंक्त बैठक लवकरच लावण्यात येईल याची ग्वाही दिली.
Comments