सकल मराठा समाजातर्फे पनवेल महापालिकेत स्विकृत नगरसेवक म्हणून गणेश कडू यांची नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार...

 पनवेल वैभव / प्रतिनिधी :- सकल मराठा समाजातर्फे शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक गणेश कडू यांचा पनवेल महानगरपालिकेत स्विकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आज मराठा समाज कार्यालय, पनवेल येथे विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मराठा समाजातर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष विनोद साबळे, जिल्हा सरचिटणीस रामदास शेवाळे, शहराध्यक्ष राजेंद्र भगत, सचिव मारुती महाडिक, खजिनदार यतीन देशमुख, एस पाटील, सचिन भगत ,विकास वार्दे राजू नलावडे, अनिल कुरघोडे,  पराग मोहिते भरत जाधव , सनी टेमघरे, निखील भगत आदी मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments