शिवसेना पनवेलतर्फे ३९१ वा शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा...

पनवेल / वार्ताहर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती शिवसेना पनवेल शहर शाखेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहना नुसार व कोव्हिडचे सर्व नियम काटेकोरपणे  पाळून उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून जयघोष  करण्यात आला, तसेच या जाणत्या राजाला, महाराष्ट्राच्या दैवताला सर्वांनी मनाचा मुजरा केला. त्याचप्रमाणे यावेळी प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्तिथीसाठी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे याची नागरिकांमध्ये देखील जनजागृती करण्याचे आवाहन जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या समवेत करण्यात आले. 

यावेळी शहर संघटक प्रविण जाधव, उपशहरप्रमुख अनिल कुरघोडे,  राहुल गोगटे, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, महिला आघाडीच्या सुनंदा पाटील,  अर्चना कुळकर्णी, उज्वला गावडे, हर्षाली परायेकर, मा.नगरसेवक विश्वास म्हात्रे, विभाग प्रमुख सुजन मुसलोंडकर,  भास्कर पाटील,  लक्ष्मण पांचाळ, जुनेद पवार,  अंकित बिराजदार, राजेश शेट्टीगार, दत्ता फडके,  सनी टेमघरे, ग्राहक कक्षाचे अमर पटवर्धन, राकेश टेमघरे, संकेत बुटाला, कुणाल कुरघोडे, आनंद घरत, रविंद्र शेट्ये,  नरुल्ला वाईकर, अभिजित साखरे, कपिल कुरघोडे,  नंदकुमार म्हात्रे, चंद्रकांत दसवते आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image