पनवेलच्या शिक्षकवृंदाचा राज्यस्तरीय शिक्षक गौरव सन्मान सोहळा औरंगाबादेत संपन्न ...
राज्यस्तरीय सन्मान पनवेल शिक्षकवृंदांचा
सोहळा झेडपी लाईव्ह एज्युकेशनचा

 पनवेल / वृत्तसेवा :- दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी झेडपी लाईव्ह एज्युकेशन घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा कोव्हिडं १९ कोरोना काळात,  या उपक्रमांतर्गत झूम द्वारे ऑनलाईन पाठ घेऊन  विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन करणे तसेच या ऑनलाइन पाठाचे यु ट्यूब वर प्रक्षेपण करणे जेणेकरून हे पाठ सर्व विद्यार्थ्यांना केव्हाही कधीही अभ्यासता येतील आणि पाहता येतील  व त्याचा उपयोग  सतत शैक्षणिक प्रगतीत  मार्गदर्शक होतील. यासाठी स्वयंप्रेरणेने सदर उपक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व शिक्षकवृंदांचा राज्यस्तरीय सन्मान अर्थात राज्यस्तरीय शिक्षक गौरव सन्मान सोहळा नुकताच औरंगाबाद येथे पार पडला .

याकार्यक्रमासाठी मा. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती मार्गदर्शन  लाभले. तसेच या सोहळ्यासाठी मा गोंदवले मुख्य कार्यकारी अधिकारी  जि.प औरंगाबाद ,मा उपसंचालक शिक्षण साबळे, मा शिक्षणाधिकारी जयस्वाल   जि.प औरंगाबाद, यांची उपस्थिती या कार्यक्रमला लाभली.  

कोरोना काळामध्ये जागतिक महामारी व जगभरात एक भयावह  अनिश्चित परिस्थिती असतानाही या परिस्थितीवर मात करत असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व आपल्या शाळा बंद असूनही शिक्षण सुरू राहावे यासाठी ऑनलाइनच्या माध्यमातून झूम ॲप  द्वारे पाठ घेऊन त्याचे युट्युब वर लाइव्ह प्रक्षेपण करणे तसेच अध्ययन निष्पत्ती नुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गाचे सर्व विषयांचे सर्व पाठ यशस्वीपणे घेऊन त्यावर आधारित मूल्यमापन यासाठी  ऍप निर्मिती करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांना  यावेळी सन्मानित करण्यात आले. ॲप उद्घाटन सोहळा यावेळी  संपन्न झाला   या उपक्रमांमध्ये मध्ये रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग तालुका पनवेल तालुक्याच्या टीमने विशेष सहभाग नोंदवला, कोरोना काळात स्वतः  कोरोनाग्रस्त  असताना तसेच घरातील करोना ग्रस्त व्यक्तींची सेवा करत शासन प्रशासनाने दिलेली सर्व प्रकारची जबाबदारी सांभाळत संपूर्ण तयारीनिशी व विविध  शैक्षणिक  पद्धतीने वेगवेगळ्या  अध्ययन अध्यापनाचे तंत्र  व शैलीचा  व डिजिटल साहित्य वापरून अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार पाठ सादर करून  पनवेल टिमने आपले मोलाचे योगदान दिले व आपला सहभाग नोंदवला हे पाठ घेत असताना आधुनिक अध्ययन अध्यापनाचे डिजिटल तंत्रज्ञान स्वतः शिकून स्वतः  समृद्ध होऊन आपल्या  अध्यापनाचा अध्ययन अध्ययपनाचा अनुभव महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्नशील अग्रेसर असणाऱ्या  पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक अर्थात रायगड जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचा यावेळी  गौरव करण्यात आला राज्यभरातील सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमात अतिशय हिरीरीने व आघाडीने पुढे होत्या. स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑफलाइन ऑनलाईन शिक्षण घेत असताना त्याच बरोबर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी सर्व शिक्षकवृंद प्रयत्नशील होते. ऑनलाईन पाठाचे सादरीकरण यावरच न थांबता विद्यार्थी मानसिक विकास ज्ञान मनोरंजन आनंद तंत्रज्ञान झेप साधण्यासाठी गंमतशाळा या रविवारच्या उपक्रमात  सुद्धा कला कार्यानुभव रांगोळी व माहिती तंत्रज्ञानाचे विविध यशस्वी पाठ  शिक्षकांनी घेतले तसेच मूल्यमापन प्रक्रियेतील टेस्ट सिरीज निर्मितीमध्ये सुद्धा सहभाग घेतला . या सन्मान सोहळ्याच्या वेळी या उपक्रमात सहभागी असलेल्या या टीममध्ये या परिवारातील ज्येष्ठ शिक्षिका सौ जयश्री मोहिते यांनी विचारमंचावर आपली मते मांडताना अतिशय सुंदर आणि प्रभावशाली उपक्रम जो राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल हा उपक्रम महाराष्ट्रभर नव्हे भारतभर पोहोचला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत आणि विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे असे मनोगत व्यक्त केले. या उपक्रमांमध्ये सहभागी रायगड जिल्हा परिषद शाळांमधील पनवेल तालुक्यातील सहभागी शिक्षकवृंदांना रायगड जि.प शिक्षण विभागातील सर्व मान्यवर अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक सहकारी शिक्षकवृंदांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले या गौरवासाठी विद्यार्थी ग्रामस्थ SMC  पालक यांच्याकडून सर्व शिक्षकवृंदांचे कौतुक होत आहे.  

शिक्षक वृंद खालील प्रमाणे.
जयश्री मोहिते, चित्ररेखा जाधव, नंदिनी कदम 
ज्योती भोपी , रजनी इंगळे ,सारिका रघुवंशी 
अक्षता पाटील, योगीनी वैदू, सिमा गायकवाड
कोसमकर मँडम, विभावरी संगासने ,विद्या म्हात्रे
स्मिता म्हात्रे ,सिमा ससाने, मनोज म्हात्रे 
अमित  लंभाते ,राजेंद्र चौधरी,शर्मिला उपरे
अपेक्षा पिंपळे, वृंदा धामणस्कर, भाग्यश्री केदार
स्मिता सावंत, अपेक्षा पिंपळे, रेखा गायकवाड
वंदना साळवी आदी झेड.पी शिक्षकांनी झेड पी विद्यार्थींसाठी केलेले काम सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन देऊन केलेला हा अनोखा उपक्रम  म्हणजे माना की अंधेरा घना है मगर दिया जलाना कहा मना है एक उर्जस्वल सोहळ्याचे आम्ही  मानकरी शिलेदार असल्याचा अभिमान  आहे असे गौरवोदगार टिम सदस्या सौ चित्ररेखा जाधव यांनी व्यक्त केले आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image