पनवेल आरटीओ, रोटरी क्लब, ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने"सिटबेल्ट जनजागृती मोहीम" खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती
खालापूर टोलनाक्यावर वाहनचालकांचे प्रबोधन
पनवेल आरटीओ, रोटरी क्लब, ड्रायव्हिंग स्कूल  असोसिएशनचे रस्ता सुरक्षा अभियान

खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल /प्रतिनिधी:- चार चाकी वाहने चालवताना वाहतुकीचे नियमा बरोबरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिटबेल्ट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अनेक वाहन चालक याकडे दुर्लक्ष करून नियम धाब्यावर बसवतात त्याचबरोबर आपला जीव सुद्धा धोक्यात घालतात. या पार्श्वभूमीवर पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय,रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांच्या वतीने सिटबेल्ट जनजागृती अभियान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोल नाका या ठिकाणी घेण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

 चार चाकी वाहनांमध्ये प्रवास करीत असताना वाहन चालक आणि बाजूच्या सीटवरील प्रवाशाने सीट बेल्ट लावणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात वाहतुकीचे  नियम सुद्धा आहे. अशाप्रकारे सिटबेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस त्याचबरोबर आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल होतो. असे असतानाही काही वाहन चालक या नियमाचे पालन करीत नाहीत . सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिटबेल्ट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे अपघातात अनेकदा वाहन चालकाचा प्राण वाचतो. दुर्दैवाने रस्त्यावर दुर्घटना घडली. आणि संबंधित वाहन चालकाने सिटबेल्ट लावला असेल तर त्याच्यातून तो बचावल्याची अनेक उदाहरणे आहेत. सुरक्षितेचा दृष्टिकोनातून सिटबेल्ट अत्यंत उपयुक्त आणि उपकारक आहे. अनेक वाहनांच्या सिटबेल्ट शिवाय अपघात कालीन परिस्थितीत एअर बॅग ओपन होत नाहीत. जर बेल्ट लावला असेल तरच त्या बाहेर येऊन फुटतात. परिणामी वाहनातील प्रवाशांचा प्राण वाचतो. या सर्व पार्श्वभूमीवर सिटबेल्ट लावूनच वाहने  चालवण्याबाबत परिवहन आणि पोलीस यंत्रणेकडून वारंवार आवाहन केले जाते. रस्‍ता सुरक्षितता अभियान यामध्ये यावर विशेष जोर दिला जातो. त्याच पार्श्वभूमीवर पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय , रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व ड्रायव्हींग स्कुल असोसिएशन यांच्या वतीने खालापूर टोल नाका येथे सिटबेल्ट जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली होती.  यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे , पनवेलचे प्रादेशिक परिवहन अभय देशपांडे, नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड, रोटरी 3131चे माजी प्रांतपाल डॉ.गिरीष गुणे, उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील सहाय्यक प्रादेशिक परिवहन परिवहन अधिकारी, गजानन ठोंबरे, सचिन विधाते, धनराज शिंदे, दिनेश बागुल, सहा. पो. निरीक्षक सचिन शेवाळे , रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष डॉक्टर अमोद दिवेकर, आय आर बी इन पनवेल व ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पनवेल यांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व ड्रायव्हिंग स्कूल असोशियन चे विवेक खाड्ये , ऋषिकेश बुवा, प्रीतम कैय्या, शिरीष वारंगे, डॉ. अभय गुरसाळे, डॉ. कांचन दिवेकर,  संतोष घोडिंदे, सुप्रिया खाड्ये, सायली सातवळेकर,आरती खेर, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अभिजित लगड, अमित गुप्ता, नरेंद्र रेड्डी, समीर पठाण, खान चाचा, बळीराम ठाकूर, सीमा पाटील, नंदकुमार साळुंखे, अतुल हारले, गणेश जांभळे, भागवत, साई मिनेकर यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले. 

चौकट
वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन जनजागृती

 सीट बेल्ट न लावणाऱ्यांना व  लावून प्रवास करणाऱ्यांना मार्गदर्शिका व गुलाब पुष्प देऊन आपला प्रवास सुखाचा होवो व प्रवासात सीटबेल्ट लावा असे आवाहन करण्यात आले. त्यांच्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह उपस्थितांनी  सिटबेल्ट विषयी जनजागृती केली.
Comments