स्ट्रॉबेरीच्या शेतीचा नाविन्यपूर्ण यशस्वी उपक्रम राबविल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविणार : प्रांताधिकारी
पनवेल / वार्ताहर : - पनवेल मधील वावंजे गावात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग सज्जन पवार व प्रशांत पवार या काका पुतण्यांनी राबविला आहे.या स्ट्रॉबेरीच्या शेतीला पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी भेट देत या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती शेतकऱ्याकडून घेतली.
       
महाबळेश्वर मध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी चक्क पनवेल मध्ये पिकवण्याचा धाडस शेतकरी सज्जन पवार व प्रशांत पवार यांनी केले आहे.विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वीपने राबविला.या शेतीची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.या नाविन्यपूर्ण प्रयोगाची माहिती घेण्यासाठी प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी वावंजे येथील सज्जन पवार यांच्या शेतीला भेट दिली.स्ट्रॉबेरीच्या शेतीची माहिती घेत शेतकरी सज्जन पवार व त्यांच्या कुटुंबियांचे कौतुकही नवले यांनी केली.एकीकडे पनवेल मध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत असताना .शेतकरी शेतीपासून दुरावला असताना पवार कुटुंबीयांनी शेती टिकवून शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविन्याचे धाडस केले हे कौतुकास्पद असल्याचे मत प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी मांडले.या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कृषी विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल असे यावेळी नवले यांनी सांगितले.
    
पनवेल  मधील कृषी अधिकारी आय डी चौधरी यांनी देखील यासंदर्भात नाविन्यपूर्ण बाबीअंतर्गत स्ट्रॉबेरी लागवड यशोगाथा अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून १५ ते २० हजारापर्यंत अनुदानासंदर्भात टिप्पणी तयार केली आहे.


फोटो :- वावंजे याठिकाणी शेतात पिकलेली स्ट्रॉबेरी प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांना दाखविताना शेतकरी पवार कुटुंबीय
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image