पनवेल, दि.५ (वार्ताहर) :-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आज पनवेल येथील प्रांताधिकारी कार्यालयावर केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात दणदणीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांसह महिला आघाडी व युवा सैनिक उपस्थित होते. यानिमित्ताने मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी बैलगाडी व सायकल रॅली काढून मोर्चा काढण्यात आला होता.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, सल्लागार शिरिष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, विधानसभा प्रमुख दिपक निकम, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उप महानगर प्रमुख दिपक घरत, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका संघटक रामदास पाटील, प्रभाकर गोवारी, लिलाधर भोईर, शहरप्रमुख अच्युत मनोरे, सदानंद शिर्के, डी. एन. मिश्रा, राकेश गोवारी, रुपेश ठोंबरे, शंकरशेठ ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत डोंगरे, युवासेना जिल्हा समन्वयक नितिन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते,प्रवीण जाधव,राहुल गोगटे, अवचित राऊत, कुणाल कुरघोडे,अतुल पलण,सुजन मुसलोंडकर,विश्वास म्हात्रे, राकेश टेमघरे, संकेत बुटाला,जुनेद पवार, महिला उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, विधानसभा संघटक रेवती सकपाळ, महानगर संघटक अॅड.शुभांगी शेलार, रुही सुर्वे, हुस्नारा खान,अर्चना कुळकर्णी, उज्वला गावडे अपूर्वा प्रभू, आदी उपस्थित होते.
चौैकट
केंद्र शासनाच्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध करताना महिला आघाडीने रस्त्यावरच चुल पेटवून भाकर्या थापल्या व त्या भाकर्या केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात भेट दिल्या.
कोट
केंद्र सरकारच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून मोठ्या प्रमाणात या दरवाढीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. ः जिल्हाप्रमुख शिरिष घरत
कोट
दरवाढीमुळे सामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. मोदी सरका फक्त अदानी व अंबानी यांच्या हिताचेच निर्णय घेत असून याचा निषेध करीत आहोत ः जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील
कोट
या महागाईमध्ये जनता होरपळून निघाली आहे. याचा आक्रोश आगामी निवडणुकीत दिसून येईल व निश्चितच महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात पण येईल ः महानगरप्रमुख रामदास शेवाळे