पनवेल / वार्ताहर : - भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट देऊन शिक्षकांच्या वेदना जाणून घेतल्या.
तसेच झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजयुमो सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची खात्री देऊन शिक्षकांची पिळवणूक करणाऱ्या राज्य सरकारप्रती निषेध व्यक्त केला.