रबाळे येथे भव्यदिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...


पनवेल / प्रतिनिधी. :- वैकुंठवासी ह भ प गोविंद महाराज कुमठेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी गावदेवी मैदान तळवली , रबाळे येथे उद्धवजी महाराज कुमठेकर आणि अंकुश महाराज कुमठेकर यांच्या वतीने भव्यदिव्य ओव्हरआर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

५१ हजार आणि चषक, २५ हजार आणि चषक , १५ हजार आणि चषक, ७ हजार आणि चषक प्रथम , द्वितीय , तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास देण्यात येणार आहे. याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक, मालिकावीर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस समारंभासाठी सदगुरू दादा महाराज मोरे माऊली, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,   आ. भरत गोगावले,  आ. मंगेश कुडाळकर, माजी आमदार माणिकराव जगताप , रा. जि .प. सदस्य चंद्रकांत कलमबे ,  विजय नाहटा, कीर्तनकार शामसुंदर सोंनर, जेष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील, निलेशदादा कोळसकर उद्योजक अनंत गोळे, सिनेअभिनेता योगेश अवसरे, सिनेअभिनेत्री शुभांगीनी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील खेळाडूना उत्तेजन मिळून भविष्यात ते राष्ट्रीय  स्पर्धेत दिसावे असे मत अंकुश महाराज कुमठेकर यांनी व्यक्त केले.
Comments