मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्यातर्फे शिवराय मनामनात,शिवजयंती घराघरात याउपक्रमाद्वारे होणार शिवजयंती साजरी....
पनवेल / वार्ताहर :- छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत.आपण जे आज आपल्या स्वराज्यामध्ये स्वाभिमानाने जगू शकतो ते केवळ आणि केवळ आपल्या महाराजानंमुळेच सात जन्मात ही भेटू शकणार नाही इतके प्रचंड उपकार आपल्या राजांचे आपल्यावर आहे त्यामुळेच आपल्यासाठी ते देवच. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आपल्यासाठी सण व उत्सवच.स्वराज्य निर्माण करण्यासाठी उभी आहेत संघर्ष करणाऱ्या महाराजांची जयंती घराघरात साजरी व्हावी याकरता शिवजयंती निमित्त विक्रांत पाटील यांच्या वतीने "शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात" या अनोख्या उपक्रमाद्वारे महाराजांची एक आकर्षक मूर्ती प्रभागातील  नागरिकांना भेट देण्यात येत आहे जेणेकरून प्रभागातील नागरिक आपल्या घरात शिवजयंतीच्या दिवशी मूर्तीचे पूजन करून महाराजांना मानाचा मुजरा करून आपला श्रद्धाभाव व्यक्त करू शकतील.

या "शिवजयंती" निमित्त खास किल्ले रायगडावरून आणल्या जाणाऱ्या "शिवज्योत" चे दर्शन नागरिक घेऊ शकतील तसेच 'शिवकालीन शस्त्रांचे' प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले आहे.शिवजयंतीच्या या उत्सवास नागरीकांनी आवश्य भेट द्यावी हे नम्र विनंतीयुक्त आवाहन मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली.

दि-१९/२/२०२१
ठिकाण-मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय,गार्डन हॉटेल च्या मागे,मॉडर्न स्वीटस जवळ.पनवेल.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image