पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन..

पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल (प्रतिनिधी) : - शहरातील झवेरी बाजार परिसरातील जोशी आळी येथील पवन अपार्टमेंटमधील शॉप क्रमांक ५ येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वर्णमेघ ज्वेलर्स या सुवर्णपेढीचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. मराठी उद्योजकांनी सुरू केलेल्या या व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक क्षेत्रात आणखी एक नवा उपक्रम सुरू झाला आहे.

भगवान पावणे आणि जगन्नाथ (राजू) पावणे हे २००९ पासून ज्वेलर्स व्यवसायात कार्यरत असून, आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वर्णमेघ ज्वेलर्सच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यावेळी नगरसेवक परेश ठाकूर यांनी स्वर्णमेघ ज्वेलर्सचे उद्घाटन करून भगवान पावणे आणि जगन्नाथ (राजू) पावणे यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या व्यवसायाची भरभराट होऊन भविष्यात स्वर्णमेघ ज्वेलर्सच्या आणखी शाखा सुरू व्हाव्यात आणि त्यांनी यशाची नवनवीन शिखरे गाठावीत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

या उद्घाटन सोहळ्याला मोतीलाल जैन, संजय जैन, कामोठे पोलीस ठाण्याचे दामोदर पावणे, बाबाजी पावणे, सुरवंता पावणे, जयवंत पावणे, शांताबाई पावणे, वसंत गोरड, मेघा पावणे, माया पावणे, चंद्रभान सिंग रावत, वसंत पावणे, अनिल इरकर, पोलीस उपनिरीक्षक बाळू बंडगर, अरुण यमगर, आबा सरगर, पांडुरंग यमगर, अंकुश पोकळे, नामदेव थोरात, विशाल बोबडे, माधव चव्हाण, प्रकाश घटूगडे, दीपक खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments
Popular posts
बेलपाडा प्रकरणाची महसूल मंत्र्यांकडून दखल ; आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला गती...
Image
आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या निधीतून साकारलेल्या महर्षी वाल्मिकी समाज सभागृहाचे जयंतीदिनी लोकार्पण....
Image
भीमाशंकर येथील झाडांच्या विनाशाबद्दल पनवेलच्या निसर्ग प्रेमींची मूक निदर्शने...
Image
वैश्य युवा सामाजिक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; खोपोलीत विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Image
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी - व्यवसायाचा मार्ग मोकळा ; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या बैठकीत महत्त्वाचे आश्वासन...
Image