पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा इक्बाल हुसैन काझी...
पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा इक्बाल हुसैन काझी

नवीन कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड; विविध कॅम्पसच्या चेअरमनपदीही नियुक्त्या


पनवेल, दि.२८ (वार्ताहर) : पनवेल एज्युकेशन सोसायटीची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यानंतर संस्थेच्या याकुब बेग हायस्कूल येथील कार्यालयात नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची सभा घेण्यात आली. या सभेत इक्बाल हुसैन काझी यांची सलग चौथ्यांदा सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत एखाद्या व्यक्तीची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. कार्यकारी मंडळाच्या सभेत उपाध्यक्षपदी अब्दुल मुकीत अब्दुल लतीफ काझी यांची निवड करण्यात आली. 
संस्थेच्या घटनेनुसार मोहम्मद नूर हसनमिया पटेल आणि अलीम अमिरुद्दिन पटेल यांची सचिवपदी, तर नवीद अब्दुल कदीर पटेल यांची खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
दरम्यान, संस्थेच्या विविध शैक्षणिक कॅम्पससाठीही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पनवेल येथील याकुब बेग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कॅम्पसच्या चेअरमनपदी असिफ हसन करेल, तळोजा येथील नॅशनल उर्दू हायस्कूल कॅम्पसच्या चेअरमनपदी मोहम्मद नूर हसनमिया पटेल, तर बारापाडा येथील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या चेअरमनपदी जव्वाद अब्दुल मुकीत काझी यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्था पदाधिकारी, सदस्य आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



फोटो : इक्बाल हुसैन काझी
Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image