वाशीच्या न्यूईरा हॉस्पिटल्सचा नवा उपक्रम ; डॉक्टरांची तपासणी ते आजारांवरील औषधांपर्यंत मिळणार सवलत...
वाशीच्या न्यूईरा हॉस्पिटल्सचा नवा उपक्रम ; डॉक्टरांची तपासणी ते आजारांवरील औषधांपर्यंत मिळणार सवलत

उपचारांचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी ‘केअर एन क्युअर कार्ड’चा शुभारंभ....


नवी मुंबई /(पनवेल वैभव)   - : अचानक एखादे आजारपण आले की डॉक्टरांकडे जाण्यापासून ते निदानापर्यंत केल्या जाणाऱ्या विविध तपासण्या, औषधांचा मारा आणि गरज पडल्यास रुग्णालयात दाखल होण्यापर्यंतचा खर्च त्या कुटुंबाच्या आर्थिक  स्थितीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे बऱ्याचदा खर्चाच्या चिंतेमुळे महत्त्वाचे उपचार पुढे ढकलले जाऊ नयेत, यासाठी वाशी येथील न्यूईरा हॉस्पिटल्सने ‘केअर एन क्युअर (CNC) कार्ड’ सुरू केले आहे. या कार्डच्या माध्यमातून विविध आरोग्यसेवांवर सवलतींसह नवी मुंबईत रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णवाहिका सेवेची सुविधाही याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि परवडणारी व्हावी, यासाठी वाशी येथील न्यूईरा हॉस्पिटल्सने ‘केअर एन क्युअर (CNC) कार्ड’ सुरू केले आहे. या कार्डच्या माध्यमातून डॉक्टरांची तपासणी, विविध वैद्यकीय तपासण्या, रुग्णालयातील उपचार तसेच औषधांवर सवलतीचे फायदे मिळणार आहेत. तसेच नवी मुंबई परिसरातील रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्यक असल्यास रुग्णवाहिका सेवेचाही लाभ मिळणार आहे.

वैद्यकीय उपचारांचा खर्च अनेकदा रुग्ण आणि कुटुंबीयांसाठी चिंतेचा विषय ठरतो. विशेषतः विविध तपासण्या, रुग्णालयात दाखल होणे किंवा नियमित औषधोपचारांची गरज असताना आर्थिक भार वाढतो. त्यामुळे उपचार किंवा आवश्यक तपासण्या केवळ खर्चाच्या चिंतेमुळे पुढे ढकलल्या जाऊ नयेत, या उद्देशाने हे कार्ड सुरू करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

न्यूईरा हॉस्पिटल्स, वाशीचे संचालक आणि ब्रेन ॲण्ड स्पाईन सर्जन डॉ. सुनील कुट्टी म्हणाले, प्रत्येकाला रुग्णाला त्याच्या आवश्यकतेनुसार आरोग्यसेवा सहजपणे उपलब्ध होणे गरजेचे आहे. तपासण्या किंवा उपचारांच्या खर्चामुळे अनेकदा रुग्ण वैद्यकीय सल्ला घेण्यास उशीर करतात. सीएनसी कार्डच्या माध्यमातून महत्त्वाच्या आरोग्यसेवांवर सवलत देऊन रुग्णांना वेळीच उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

न्यूईरा हॉस्पिटल्सचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मताप्रसाद गुप्ता म्हणाले , आरोग्यसेवा वेळेवर, सोयीची आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी. सीएनसी कार्डमध्ये बाह्यरुग्ण तपासणी, वैद्यकीय चाचण्या, रुग्णालयातील उपचार आणि औषधांशी संबंधित सवलती उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्यासाठी उपलब्ध असलेली रुग्णवाहिका सुविधाही या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.या उपक्रमातून रुग्णांना उपचारांचा खर्च काही प्रमाणात कमी करण्यास मदत होत त्याचबरोबर आर्थिक कारणांमुळे उपचारांना विलंब करण्याची गरज यापुढे भासणार नाही.
Comments